दौंड :-दौंड दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी दत्तपीठ दत्त मंदिर, दौंड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, गुणगौरव पुरस्कार आणि वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त दौंड शहरातील वृत्तपत्र सेवा पुरवणारे वृत्तपत्र विक्रेते यांचा दत्तपीठ दत्त मंदिरा, दौंड तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी जागर संस्कृतीचा आणि जागर लोककलेचा या समूहातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले..यामध्ये श्री श्याम वाघमारे यांनी पिंगळा व भारुड नृत्य कला सादर केली. सादर केलेली कला पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. अतिशय सुंदर रीतीने दोन्ही कलाप्रकार सादर करण्यात आले. महिला भगिनींनी “राम आयेंगे “हे गीत नृत्य प्रकारात सादर केलं त्यांनाही प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.श्री दत्तपीठ दत्त मंदिरा तर्फे गिरीमच्या आदर्श सरपंच संगीता किसन मदने यांचा विशेष सत्कार शशिकला सावंत, स्वाती सावंत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर संदीप कटारिया यांनी ट्रेकिंग द्वारे अनेक ठिकाणी भ्रमंती करून एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वी केला याबद्दल त्यांचा सत्कार श्री निलेश सावंत आणि नरेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. जेष्ठ कलाकार श्री श्याम वाघमारे यांचा मानचिन्ह,पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.आरतीचा मान श्री व सौ मंगल विनय लोटके या दाम्पत्यांना देण्यात आला. तर श्री व सौ सुनीता संदीप कटारिया यांचा पुष्पहार मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.डॉक्टर संदीप कटारिया यांनी अन्नदानासाठी पाच हजार रुपयेची देणगी दिली. लोककलेच्या माध्यमातून झोळीला मिळालेले दान श्री.शाम वाघमारे यांनी श्री दत्तपीठ मंदिराला भेट दिले.लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्री. मनोहर बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.” वृत्तपत्र विक्रेते यांनी जनमानसात खूप महत्त्वाचे व मानाचे स्थान मिळवले आहे.दिव्यांग ताई नाईक या पहाटे चार वाजल्यापासून वृत्तपत्राची सेवा देतात असतात. दौंड शहर वृत्तपत्र विक्रेते संघाचे बाबू म्हेत्रे, अजय लेले,प्रज्वल म्हेत्रे, पवन म्हेत्रे , कैलास परकाळे,उमेश परकाळे, मार्लिंग कल्पनूर विनायक ननवरे , राहुल साळुंखे,संघराज गायकवाड, रवींद्र काळे, राकेश म्हेत्रे, गोविंद नाईक, प्रेम कुमार पिल्ले, रेड्डी आकाश गोपरेड्डी, आकाश मेरोळ , राहुल माशाळ, कुंडलिक होले आदी.वृत्तपत्र विक्रेतांचा सत्कार मानचिन्ह, पुष्पहार व शाल देऊन करण्यात आला.यावेळी श्री व सौ मंगला ताकवले, श्री व सौ साधना सुनील देशपांडे,श्री व सौ सुनंदा गुलाब ठाणगे,श्रीमती उज्वला जोशी,श्री व सौ जयश्री पवार यांचा सर्वांचा अन्नदानासाठी देणगी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.आरती लेले व ग्रुप यांनी “महा भोंडला “सादर केला.आरती नंतर महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला. पावसाने मध्येच हजेरी लावली तरी या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित लावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना साने यांनी केले. मंदीराचे विश्वस्त बुवा सावंत, ॲड. श्री विलास बर्वे, सचिन साने , कुंडलिक चुंबळकर, निलेश सावंत यांनी आलेल्या पाहुण्याचे व भाविकांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू हजारे, एकनाथ कोरडे, सोनू सावंत, रतन बोधे, राहुल हजारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
अश्विन पोर्णिमेनिमित्त श्री दत्तपीठ दत्त मंदिर, दौंड यांच्या वतीने वृत्तपत्र सेवा पुरवणारे वृत्तपत्र विक्रेत्यांचा मानचिन्ह देऊन विशेष सत्कार…
RELATED ARTICLES
- Advertisment -
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92 ए 12417.1750024694.3017E42F
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92A12417.1750021409.2F9BB771
Source link
जिन – पाळीव प्राणी ओटीटी रीलिझ तारीख: तामिळ हॉरर -कॉमेडी ऑनलाईन कधी आणि कोठे...
जिन - पाळीव प्राणी शेवटी या जूनमध्ये सननक्स्टसह डिजिटल पदार्पण करण्यास तयार आहे. ही तमिळ हॉरर कॉमेडी टीआर बाला यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली...
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92 ए 12417.1750016070.2EEE20601
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.b4e22517.1750014502.4badf525
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92 ए 12417.1750024694.3017E42F
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92A12417.1750021409.2F9BB771
Source link
जिन – पाळीव प्राणी ओटीटी रीलिझ तारीख: तामिळ हॉरर -कॉमेडी ऑनलाईन कधी आणि कोठे...
जिन - पाळीव प्राणी शेवटी या जूनमध्ये सननक्स्टसह डिजिटल पदार्पण करण्यास तयार आहे. ही तमिळ हॉरर कॉमेडी टीआर बाला यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली...
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92 ए 12417.1750016070.2EEE20601
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.b4e22517.1750014502.4badf525
Source link