बोरोळ (लातूर) :- महाराष्ट्र मध्ये विधानसभा 2024 निवडणूक जाहीर होताच संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून जो तो पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.त्यातच दिनांक २७/१०/२०२४ रोजी 238 निलंगा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ( कॉंग्रेस ) अधिकृत उमेदवार श्री.अभय साळुंखे यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल पानचिंचोली या गावचे सुपुत्र,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, बोरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री लक्ष्मण नाथ महाराज मठ देवस्थान इथपर्यंत रॅली काढण्यात आली.
बोरोळ मध्ये कार्यकर्ते व ग्रामस्थांनी फटाक्याची अताषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला. अभय साळुंखे यांना तिकीट म्हणजेच निलंगा विधानसभा मध्ये बदलाचे वारे, असे कार्यकर्ते मध्ये बोलले जात होते. तसेच “आता नाही भय, कारण येतोय अभय”अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक,बोरोळ येथे फटाके वाजवत जल्लोष केला.
यावेळी प्रमोद कृष्णा पाटील, दीपक पाटील, शिवाजी शेंडगे, प्रमोद जवळदापके, पंढरीनाथ खुळे, व्यंकट पाटील, निवृत्ती सूर्यवंशी, राहुल बालूरे, महादू लखनगावे, रमेश बिरादार, संजय कोयले, धोंडीबा मुळखेडे, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान असे जरी असले तरी मतदार राजा कोणाला कौल देणार आणि कोणाला डावलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी :-सत्यदेव गरड,बोरोळ. (लातूर)