Homeक्राईमएटीएम सेंटरची चोरी करण्याच्या तयारीत असणारी आंतरराज्य टोळी जेरबंद.....

एटीएम सेंटरची चोरी करण्याच्या तयारीत असणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…..

शिरूर :- हरियाणा व राजस्थान या राज्यामध्ये एटीएम सेंटरची चोरी करणारी टोळी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये आली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने आपली गोपनीय यंत्रणा सतर्क करून हरियाणा व राजस्थान राज्य मधून आलेल्या टोळीची माहिती घेण्यास सुरुवात केली असता सदरची टोळी ही RJ 52GA 7916 या नंबरचा टाटा कंपनीचा कंटेनर घेऊन आलेली असून या नंबरच्या मालवाहतूक कंटेनर मधून येतात व एटीएम सेंटरची चोरी करतात.
सदरची टोळी ही पुणे नगर हायवे वरील सरदवाडी गावाच्या हद्दीतील हरियाणा मेवाती ढाबा या ठिकाणी कंटेनर उभा करून थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व पोलिसांच्या मदतीने 4 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलीस पथकाने अचानक छापा टाकून कारवाई करून कंटेनरसह तीन इसमांना ताब्यात घेतले तर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
ताब्यात घेण्यात आलेली आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
1) कुतुबुद्दीन अख्तर हुसेन,(वय वर्षे 31)रा. सोमका ता. पहरी जि. भारतपूर राजस्थान, 2) यसीन हरून खान (वय वर्षे 32)रा.गुंडेता ता. पुन्हान जि. नुह हरियाणा 3) राहुल रशीद खान (वय वर्षे 32)रा. फलेंडी ता. पुन्हान जि. नूह हरियाणा अशी असून इतर आरोपी नामे 4) नौशाद उर्फ नेपाळी पूर्ण नाव माहित नाही 5) लेहकी पूर्ण नाव माहित नाही दोघे राहणार घासैडा, गांधीग्राम जि. नुह हरियाणा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत .
नमूद आरोपींच्या ताब्यातून RJ 52GA 7916 या नंबरचा टाटा कंपनीचा कंटेनर, एटीएम मशीन कटिंग करण्यासाठी लागणारे गॅस कटर, गॅस टाकी, कटावणी,पहार, स्प्रे बॉटल,रस्सी इत्यादी साहित्यसह अंदाजे एकूण किंमत 15,17,400/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 924/2024 भा. न्या. सं. 310(4) याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
नमूद केलेल्या आरोपींनी महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून कुठे कुठे गुन्हे केलेले आहेत त्यांच्याकडे मिळून आलेल्या दरोडेच्या साहित्य चा वापर करून आणखीन कुठे कुठे गुन्हे करणार होती. अशा विविध मुद्द्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरूर पोलीस स्टेशन चे तपास पथक तपास करणार आहेत. सदर आरोपीस मा. न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांची 7नोव्हेंबर 2024रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. ह. तुषार पंदारे,जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पो.ह. प्रफुल भगत, पोलीस अं. नितेश थोरात,नीरज पिसाळ, विजय शिंदे, निखिल रावडे यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750024694.3017E42F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750021409.2F9BB771 Source link

जिन – पाळीव प्राणी ओटीटी रीलिझ तारीख: तामिळ हॉरर -कॉमेडी ऑनलाईन कधी आणि कोठे...

जिन - पाळीव प्राणी शेवटी या जूनमध्ये सननक्स्टसह डिजिटल पदार्पण करण्यास तयार आहे. ही तमिळ हॉरर कॉमेडी टीआर बाला यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750016070.2EEE20601 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750014502.4badf525 Source link

error: Content is protected !!