Homeक्राईमदौंडला आर्थिक देवाण-घेवाण व व्यावसायिक वर्चस्वातून मित्राने मित्राचा केला खून...

दौंडला आर्थिक देवाण-घेवाण व व्यावसायिक वर्चस्वातून मित्राने मित्राचा केला खून…

दौंड :- रात्रीच्या सुमारास बोरावके नगर जवळून लिंगाळी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी अज्ञात इसमाने लाकडी दांड्याच्या साह्याने युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमध्ये युवा व्यावसायिक अमोल सुभाष साळुंखे (वय वर्षे 33 रा. बोरावके नगर. ता. दौंड. जि. पुणे ) याचा खून झाल्याची सदर घटनेची फिर्याद अमोलची पत्नी तेजस्वी साळुंखे यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिली. दौंड पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व रात्री च तपासाची सूत्रे वेगाने हलवत मयत अमोल साळुंखे यांचा व्यवसायिक भागीदार महेश गणेश काळे (वय वर्षे 33.रा. बोरावके,गोपाळवाडी, ता.दौंड जि. पुणे, मुळ रा. अजनूज ता. श्रीगोंदा) यास अटक केली. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस,स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिस पथकांनी केली असल्याची माहिती पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषद दिली.
दरम्यान घडलेली हकीगत अशी की, मयत अमोल साळुंखे हे रात्रीचे साडेदहा वाजून गेले तरी घरी आले नाही म्हणून अमोल साळुंखे यांच्या पत्नी तेजस्वी साळुंखे व त्यांचे मामा रात्रीच्या वेळेस शोध घेत असता जखमी अवस्थेमध्ये अमोल हे त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये आढळून आले. त्यांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असता उपचाराधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत अमोल व महेश काळे हे दोघे भागीदारीमध्ये व्यवसाय करत होते.व्यावसायिक भागीदार असल्यामुळे व्यावसायिक वर्चस्व तसेच आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाल्यावर लाकडी दांड्याच्या साह्याने हल्ला करून अमोल यास जखमी अवस्थेत सोडून गेले.
सदरच्या घटनेनंतर पोलिसांनी सूत्रे हलवत आजूबाजू च्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशन तपासून आरोपीस 18 तासाच्या आतच जेरबंद केले. दुसरा आरोपी गणेश मोरे (वय वर्षे 35 रा. मोरे वस्ती ता. दौंड जि. पुणे )यास नंतर अटक करण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, तुकाराम राठोड व राहुल गावडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे असिफ शेख, योगेश नागरगोजे, सचिन घाडगे, राजू मोमीन, भुजबळ तसेच पोलीस कर्मचारी पांडुरंग थोरात, निखिल जाधव, अमीन शेख, बापू रोटे, सुभाष राऊत, नितीन बोराडे या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750706850.b855f08 Source link

ओमानच्या खाली सापडलेल्या ‘घोस्ट’ प्ल्युमने भारताच्या प्राचीन टेक्टोनिक शिफ्टचे स्पष्टीकरण देऊ शकते

ओमानच्या सल्मा पठाराच्या खाली असलेल्या मॅग्माच्या एका लांबलचक प्लमने भारतीय उपखंडातील प्राचीन प्रवासाला आकार देण्यास आश्चर्यकारक भूमिका बजावली असावी, असे संशोधकांनी सांगितले. पृथ्वीच्या जाड...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750704645.2378329 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.1750701478.23141A8B Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750699469.B41CCFE Source link

error: Content is protected !!