Homeसामाजिकदौंडला नियोजित नालंदा ‘बुद्ध विहार व बहुउद्देशीय प्रकल्प’ भूमिपूजन समारंभ संपन्न….

दौंडला नियोजित नालंदा ‘बुद्ध विहार व बहुउद्देशीय प्रकल्प’ भूमिपूजन समारंभ संपन्न….

दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी अशोक विजयादशमी या दिवशी 68 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने अशोक विजयादशमी या दिवसाला ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ असेही संबोधले जाते. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी, 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी स्वमालकीच्या खरेदी केलेल्या जागेवर नियोजित ‘नालंदा बुद्ध विहार व बहुउद्देशीय प्रकल्प’  जागेचा भूमिपूजन कार्यक्रम समारंभ मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नियोजित नालंदा बुद्ध विहार समिती बहुउद्देशीय प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. भिमराव मोरे हे होते. याप्रसंगी भन्ते प्रज्ञाबोधी यांचे हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वभूषण परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भन्ते प्रज्ञाबोधी यांनी धम्म देसना दिली याप्रसंगी ते म्हणाले “मनुष्याच्या उत्कर्षाचा खरा आधार बौद्ध धम्म आहे, मानवी कल्याणकारी असणारा बौद्ध धम्म प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . सदर बहुउद्देशीय प्रकल्पामध्ये पाली भाषा अभ्यास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिला, पुरुष व युवक रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र, भिक्खू निवास, श्रामणेर,  बौद्धाचार्य व बालसंस्कार केंद्र,  अद्ययावत ग्रंथालय, विकास व तांत्रिक कौशल्य केंद्र आदी बहुउद्देशीय प्रकल्प राबविले जाणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ. भिमराव मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कु. समर्थ सुळ, गौतम बेलखेडे, आपचे तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव, जलालपूरचे (तालुका कर्जत) सरपंच प्रकाश मोरे, वंचित बहुजन आघाडीचे आश्विन वाघमारे, घोडके मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी लागणारी जागा खरेदी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष  प्रा. डॉ. भिमराव मोरे, सचिव बी. वाय. जगताप, उपाध्यक्ष सैदप्पा गायकवाड, कार्याध्यक्ष दिलीप आढाव,  कोषाध्यक्ष दिलीप सुरवसे, कार्यालयीन सचिव विजयकुमार गायकवाड, सदस्य अरुण ओहळ, सूर्यकांत जानराव, श्रीधर बाळेकुंद्री, गोरख घोडके,  गौतम बेलखेडे, राजू कांबळे, विलास कदम, राजू नाईकनवरे, राजू आढाव यांनी यथाशक्ती धम्मदान दिले. याप्रसंगी लिंगाळीचे माजी सरपंच नरेश डाळिंबे, नरेश वाल्मिकी, संजय आढाव, शरद सरोदे, चंद्रकांत कदम, ॲड. शितल मोरे,  विमल सुरवसे,  सारिका आढाव, सागरबाई ओव्हाळ,  संगीता मोरे, सारिका ओहळ, शिल्पा कांबळे, जयश्रीताई गायकवाड,  कांबळेताई,  वंदना बेलखेडे, नंदा बाळेकुंद्री, विमल गायकवाड, सुरभि मोरे, सिमा मोरे, नागेश साळवे, श्रीकांत थोरात, अमित सोनवणे, बापू कांबळे, राजू दोरड,  माऊली सूर्यवंशी, दत्ता साबळे,  प्रा. डॉ. किरण जाधव, अरुण ढेकळे, अर्जुन मोरे, आनंद बगाडे, अनिल साळवे, विशाल माशाळकर, अविनाश उबाळे, संतोष गायकवाड, पिंटू डाळिंबे, सुरेश मोरे, नागेश तोरे, प्रमोद सावंत, श्रीकृष्ण मोरे, बी. वाय. धीवर, मरिप्पा कोरी, लांडगे गुरुजी, शांताराम कांबळे, अर्जुन कांबळे, राजू शिंदे, निखिल स्वामी, के. के खंडीझोड‌, भिमराव सोरटे, राहुल संसारे, प्रदीप बगाडे, संजय सोनवणे, साईनाथ कुलकर्णी, दीपक कुंभार, विकास वाल्मिकी, पिंटू भागवत, भाऊसाहेब मोरे, मोहन जोगदंड, किशोर सोनवणे, संदीप कांबळे, अश्विन कांबळे, जयराम सोनवणे, शंकर गायकवाड, तुषार कोकाटे, सुरेश लोंढे, सत्यशील ओव्हाळ, अशरक काळे , उत्तम जावळे, हरिभाऊ काळे, डॉ. सम्यक बेलखेडे, आरती बेलखेडे, बाबू कांबळे, सुरेश सूळ, रघू सूळ आदी मान्यवर व नागरिक महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी नगरसेवक विलास शितोळे, जीवराज पवार, दीपक सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. वाय. जगताप यांनी नालंदा बुद्ध विहार व बहुउद्देशीय प्रकल्पाचा आढावा घेतला, अध्यक्षीय भाषण प्रा. डॉ. भिमराव मोरे यांनी केले. सूत्रसंचलन दिलीप सुरवसे यांनी तर आभार विजयकुमार गायकवाड यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.175075840.9576 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750755604.358A473E Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750754915.C366487 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.501D1002.1750750517.4B40BFDC Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750744879.2506c7b5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.175075840.9576 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750755604.358A473E Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750754915.C366487 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.501D1002.1750750517.4B40BFDC Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750744879.2506c7b5 Source link
error: Content is protected !!