दौंड: :- 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या संदर्भात निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती त्या समितीने उपवर्गीकरणाचा निर्णय दिला. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते हा उपवर्गीकरणाचा जीआर आमदार अमित गोरखे यांच्या हातात सुपूर्द केला. हा जीआर मिळताच मातंग समाजाच्या वतीने दौंड येथील साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरामध्ये मातंग बांधवांनी एकमेकास पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला. मातंग समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अनुसूचित जातीचे अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण.
या अ,ब,क,ड वर्गीकरणासाठी अनेक मातंग समाजातील तरुणांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. अनेक संघटनांनी लढा दिला. समाजातील विशेष करून जेष्ठ,तरुण व महिलांनी अनुसूचित जातीचे अ, ब,क,ड नुसार वर्गीकरण झालेच पाहिजेल यासाठी जीवाची परवा न करता शेवटपर्यंत लढा दिला व अखेर या लढ्याला यश आले. विजय मात्र सत्याचाच झाला.
त्यामुळे सगळीकडेच उत्सवाचे वातावरण तयार झाले,असून यामुळे भविष्य काळात अनुसूचित जातीतील सर्वाना याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास मातंग समाजाच्या वतीने व्यक्त केला.
त्यावेळी मातंग समाजातील लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नितीन तूपसौंदर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर स्वाभिमानी महाराष्ट्र न्यूज, उपसंपादक पत्रकार योगिता रसाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश तूपसौंदर्य, सागर कांबळे,धीरज दिवटे,निखिल ससाने,महेश गायकवाड,गणेश खंडागळे,तुकाराम तूपसौंदर्य,शुभम तूपसौंदर्य,मयूर तूपसौंदर्य, सौरव आगलावे,ओमकार खुडे आणि सर्व समाज बांधवांनी मिळून आनंद उत्सव साजरा केला.