प्रतिनिधी :- सत्यदेव गरड,बोरोळ. ता. देवणी
बोरोळ :-बोरोळ परिसरामध्ये परतीच्या पावसाने झोडपले ,अचानक सुरु झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . बळी राजा पुन्हा संकटात आला तर सामान्य जन जीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसलं.दि.२१ ऑक्टोबर२०२४ रोजी सायंकाळी ०७ : ३० च्या सुमारास बोरोळ व परिसरा मध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.अवकाळी पडलेल्या पावसामुळे सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून, शेतातील कामांना खिळ बसली आहे.तसेच रब्बी हंगामातील पेरण्या आता दिवाळीच्या नंतरच होतील अशी शक्यता नाकारता येत नाही.