सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने
कोण?कोणती?गैरकृत्य केल्यास मानला जातो आदर्श आचारसंहिते चा भंग.टीका, टिपणी, मजकूर करणे, व्हिडिओ, फोटो एडिट व मॉर्फीग करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे अथवा आलेल्या संदेशावर आक्षेपाहर्य मत प्रकट करणे किंवा पुढे पाठवणे. कोणत्याही उमेदवाराशी अथवा राजकीय पक्षाशी त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक अगर सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे प्रसारित करणे.
मतदाराचे मत वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीय द्वेष पसरवणारे टीका टिपणी करणारे व्हिडिओ फोटो मजकूर बनवून प्रसारित करणे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारची स्वतंत्र सोशल मीडिया ग्रुप बनवून त्यावर टीका, टिपणी मजकूर करणे व ती प्रसारित करणे अथवा तसे कृत्य करणे.सोशल मीडियावर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मतदान करावे अथवा करू नये व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप द्वारे किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मतदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये.
कुठल्याही व्हाट्सअप ग्रुप मध्ये आचारसंहितेचा भंग होईल किंवा दोन गटांमध्ये वाद होईल अशी टीका,टिपणी, मजकूर, व्हिडिओ, फोटो प्रसारित केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिन जबाबदार असणार आहे. त्यासाठी ॲप ची सेटिंग मध्ये बदल करून ओन्ली ॲडमिन करून घ्यावी.
वरील सूचनांचे पालन करणे हे आपल्याला बंधनकारक राहील आपल्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास आपल्यास जबाबदार धरण्यात येईल व आपल्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले.