Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे अजित पवार यांचे निकटवर्ती रमेश थोरात यांना...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे अजित पवार यांचे निकटवर्ती रमेश थोरात यांना दौंड विधानसभेची उमेदवारी जाहीर….

दौंड :- 28 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये अजित पवार यांचे निकटवर्तीय पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटांमध्ये प्रवेश केला असून दौंड तालुक्यातून विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजी रमेश थोरात कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी शक्ती प्रदर्शन करीत,जेसीबी वरून फुलाची उधळण करीत, वाजत गाजत छत्रपती शाहू महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा घेण्यात आली. या सभेत दौंड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, मा.नगरसेवक तर दौंड तालुक्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी रमेश थोरात यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करावा “राम कृष्ण हरी, तुतारीच बरी ” एकच एक्का रमेश आप्पा” अशा घोषणा देत जास्तीत जास्त मतदान” तूतारी वाजवणारा माणूस” या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करावे.” खरं बोलणे ही काही टीका नाही आणि खऱ्याला मरण नसतं, अशा प्रकारचे बोचरी टीका कार्यकर्त्यांनी केली. खोटे गुन्हे दाखल करणे, दडपशाही करणे, तालुक्याचा विकास न करता, पोकळ गप्पा मारणे, हेच काम केले अशी महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये जहाल टीका केली. तर पाच वर्षे आमदारकी व जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून काम करून देशात व राज्यात नावारूपाला नेली. दौंड तालुक्यात सर्वांची कामे गेली 40 वर्षें केली. नामदेव ताकवणे, आप्पासाहेब पवार यांनी मोठेपणा दाखवून मला शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी मदत केली.

प्रत्येक माणसाचं काम करणे, चांगल्याला चांगलं म्हणा, वाईट ला वाईट म्हणा… रमेश आप्पा स्पष्ट बोलणारा माणूस आहे, अशा शब्दात रमेश थोरात यांनी आपले मत व्यक्त केले. प्रत्येकांचे काम व लोकांची सेवा करण्यासाठी मला मतदान करून निवडून द्यावे.,असे आवाहन रमेश थोरात यांनी दौंड तालुक्यातील नागरिकांना केले.
यावेळी महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दौंड शहर व तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते . दापोडी गावचे पदाधिकारी लालासाहेब रुपनवर, शरद थोरात, संजय ठोंबरे, बापूसाहेब शिंदे, बापूराव चव्हाण, तसेच गिरीमचे शिवाजी मदने, कासुर्डीचे संतोष चव्हाण, कासुर्डी चे विद्यमान उपसरपंच दिलीप आखाडे,केडगाव चे प्रमोद निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रमेश थोरात यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750021409.2F9BB771 Source link

जिन – पाळीव प्राणी ओटीटी रीलिझ तारीख: तामिळ हॉरर -कॉमेडी ऑनलाईन कधी आणि कोठे...

जिन - पाळीव प्राणी शेवटी या जूनमध्ये सननक्स्टसह डिजिटल पदार्पण करण्यास तयार आहे. ही तमिळ हॉरर कॉमेडी टीआर बाला यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750016070.2EEE20601 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750014502.4badf525 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1750010305.E0F8F6 Source link

error: Content is protected !!