राहुरी :-दिनांक 18ऑक्टोबर 2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हददीतील राहुरी खुर्द या गावानजीक हॉटेल न्यू भरत यामध्ये वेश्या व्यवसाय चालवित असल्याची गुप्त माहिती बातमीदार मार्फत पोलिसांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने नमूद केलेल्या हॉटेलवर बनावट ग्राहक पाठवून खात्री करूनच तपास पथकानी वेश्याव्यवसाय करणाऱ्या कुंटणखाण्यावर पंचा समक्ष छापा टाकून इसमनामे विक्रम सुरेश विशनानी अंग झडती घेतली असता वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व एक हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 21 हजार रुपये मुद्देमाल जप्त केला. सदर इसमासह हॉटेलची पाहणी केली असता तीन महिला आढळून आल्या ची माहिती पोलिसांनी दिली असून .राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पो. ना.विकास साळवे , सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड , स्थानिक गुन्हे शाखेचे, तुषार धाकराव,पो.ना संदिप दरंदले , म.पो.कॉ सारिका नारायण दरेकर , सायबर पोलीस स्टेशनचे पो.कॉ रंजित जाधव , पो.ना राजेंद्र खैरे , पो.कॉ विशाल तनपुरे सह पोलीस पथकाने हॉटेल न्यु भरत येथे छापा टाकुन वेश्या व्यवसाय करुन घेणारे आरोपी नामे 1) विक्रम सुरेश विशनानी (वय. 27वर्षे रा. तनपुरे वाडी ता. राहुरी जि. अहिल्यानगर )2) फराद अहमद सय्यद (वय. 38वर्षे रा. पाण्याचे टाकीजवळ राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर) यांना अटक केली असून अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3 4 5 7 8 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सजय ठेंगे करत आहेत.
सदरची कारवाई .राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,बसवराज शिवपुंजे , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग ,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.