दौंड :-दौंड विधानसभा मतदारसंघातून एकूण 20 उमेदवारांची नामनिर्देशक यादी सहा. निवडणूक अधिकारी दौंड अरुण शेलार यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली होती. राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवार यांच्यापैकी 4 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतली तर दौंड विधानसभेच्या रिंगणात 14 उमेदवार असून सरळ लढत राहुल कुल व रमेश किसनराव थोरात यांच्या मध्ये लढत होईल अशी दौंडकरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीतून माघार घेण्याचे आपल्या उमेदवारांना आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार सर्व मराठा उमेदवारांनी आप आपले अर्ज माघारी घेतल्या चे चित्र दिसून आले.
दौंड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) वीरधवल जगदाळे,वंचित बहुजन आघाडीचे बादशहा शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट ) संदीप आढाव,अपक्ष उमेदवार वसंत साळुंखे, राजाभाऊ तांबे, सुमन मस्के यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
दौंड विधानसभा मतदार संघातील 14 उमेदवार राहुल सुभाषराव कुल (भाजपा)चिन्ह :-कमळ,रमेश किसनराव थोरात ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ) चिन्ह :-तुतारी वाजवणारा माणूस ,रमेश जयसिंग थोरात (राष्ट्रीय मराठा पार्टी),चिन्ह :-ट्रंपेट अविनाश अरविंद मोहिते(संभाजी बिग्रेड पार्टी)चिन्ह :-,शिलाई मशीन, योगेश दत्तात्रय कांबळे (बहुजन समाज पार्टी)चिन्ह :-,हत्ती तर अपक्ष उमेदवारांना देखील निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप झालेली आहेत उमेदवारांची नावे व चिन्ह पुढील प्रमाणे :-
राजेंद्र निवृत्ती मस्के,(कपाट) जितेंद्र कोंडीराम पितळे( इस्त्री ),बिरुदेव सुखदेव पापरे, (एअर कंडिशन )जाधव सुरेश भिकु(सी. सी. टीव्हीकॅमेरा),संजय अंबादास कांबळे(गॅस सिलेंडर )उमेश महादेव म्हेत्रे (स्टूल ),शुभांगी नवनाथ धायगुडे(किटली) ,रवींद्र कुशाबा जाधव( प्रेशर कुकर),सागर मारुती मासुडगे(खिडकी) दौंड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
199 दौंड विधानसभेमध्येएकूण 313 मतदान केंद्र आहेत 1,63,917,पुरुष मतदार व 1,55,383महिला मतदार आणि 11 तृतीय पंथी असे एकूण 3,19,311 मतदार दौंड तालुक्यात आहेत.85वर्षे वरील मतदार 3848,दिव्यांग मतदार 3168,सेवा मतदार 298, दिव्यांग व 85 वर्षावरील मतदारास मतदान केंद्र पर्यंत नेण्या आणण्यासाठी व्हील चेअर्स तसेच पहिल्यांदाच18वर्षे पूर्ण झालेले मतदारांची एकूण संख्या 8857 त्यापैकी पुरुष मतदार5483 तर महिला मतदार3373व इतर एक आहे.एक आरो, तीन बी आर ओ, झोनल 29ऑफिसर, सेक्टर ऑफिसर, दहा ते 12 मतदार केंद्र साठी एक सेक्टर ऑफिसर,181 पोलीस स्टेशन, लोकेशन इमारतीआहेत.48बसेस10जीप असे एकूण 58,वाहने, 313 बॅलेट पेपर निवडणूक घेतली जाईल अशी माहिती 199 दौंड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पाणी, लाईट आणि रॅम सुविधा तर सी -विजील अँप वापरून सर्व जागृत मतदार व नागरिकांनी आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार या ॲपद्वारे ऑनलाइन करण्याचे आवाहन दौंड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी मतदारांना केली.