बोरोळ (निलंगा)-. *238 – निलंगा मतदार संघामध्ये एकूण 13 उमेदवार रिंगणात, 28 उमेदवारांनी 46 नामनिर्देशन पत्र केले होते दाखल, 9 उमेदवारांनी घेतली माघार ,यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा समावेश* निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 28 उमेदवारांनी 46 नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. त्यापैकी नामनिर्देशन पत्र माघार घ्यावयाच्या तारखेपर्यंत म्हणजेच दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 03 : 00 वाजेपर्यंत एकूण 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसूचनेनुसार नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी दिनांक 22 ऑक्टोबर 2024 ते 29 ऑक्टोबर2024 असुन या कालावधीत एकूण 46 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची छानणी दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आली. यामध्ये 06 नामा निर्देशक पत्र अपात्र ठरल्याने उर्वरित 22 नाम निर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांपैकी 4 नोव्हेंबर 2024 रोजी नऊ उमेदवारांनी माघार घेतली असून निवडणुकीसाठी उभे असलेल्या अंतिमउमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे.1) अभय सतीश साळुंखे, इंडियन नॅशनल काँग्रेस 2) कांबळे ज्ञानेश्वर साधू, बहुजन समाज पार्टी 3) संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टी 4) आकाश प्रकाश पाटील राष्ट्रीय मराठा पार्टी 5) नागनाथ रामराव बोडके, राष्ट्रीय समाज पक्ष 6) सौ. मंजू हिरालाल निंबाळकर, वंचित बहुजन आघाडी.7) हनुमंत धनुरे, प्रहार जनशक्ती पार्टी व अपक्ष म्हणून 8) अन्वर हुसेन मैनोद्दीन सय्यद,9) दत्तात्रय भानुदास सूर्यवंशी 10) दत्तात्रय विश्वनाथ सूर्यवंशी 11) निळकंठ गोविंदराव बिरादार 12) फैय्याजमिया पाशामिया शेख 13) महमूद पाशा खर्षीद अहमद मुल्ला हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत . 4 नोव्हेंबर 2024 रोजी माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र श्री. अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर* यांचा देखील समावेश आहे. एकंदरीतच ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच रंगणार असल्याची चर्चा निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावागावांमध्ये बोलली जात आहे.
प्रतिनिधी :- सत्यदेव गरड ( बोरोळ )